आपला जिल्हा

शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयाचे घवघवीत यश

⬛ 10 विद्यार्थी जिल्हायादीत तर शिष्यवृत्तीधारक ठरले 31 विद्यार्थी

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नूतन विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून 10 विद्यार्थी जिल्हायादीत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत तर 31 विद्यार्थी पात्र झाले आहेत.

इयत्ता पाचवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

चि. तन्मय जयकिशन भुतडा राज्यात 17 वा आला आहे. 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल 2 जुलै 2024 रोजी जाहीर झाला आहे.

इयत्ता आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

01) चि. तन्मय जयकिशन भुतडा 89.93%
जिल्ह्यात 2 रा, राज्यात 17 वा 02) कु. सानवी गजानन शितळे 84.56% जिल्ह्यात 4 थी 03) चि. विठ्ठल अजयकुमार बोरसे 78.91% जिल्ह्यात 20 वा तर इयत्ता आठवीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे 01) चि. सक्षम सुरेश आर्दड 79.86% जिल्ह्यात 7 वा 02) कु. आर्या भाऊराव घं। डगे 74.49% जिल्ह्यात 11 वी 03) चि. शार्दूल विजय जोशी 74.49% जिल्ह्यात 12 वा 04) चि. प्रणव रमेश घोडके 71.14% जिल्ह्यात 26 वा 05) कु. दर्शना रेणुकादास जोशी 68.45% जिल्ह्यात 39 वी 06) कु. प्राची बालासाहेब शिंदे 67.11% जिल्ह्यात 48 वी 07) कु. श्रेया राजू द्यावरवार 63.75% जिल्ह्यात 76 वी गुणवत्ता प्राप्त केली आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख विरेश कडगे, बंसीधर पद्मावत, आरती कदम, वर्षा कदम, गजानन मुळी यांचे मार्गदर्शन लाभले तर इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सुनील तोडकर, अरविंद अंबेकर, बाळू बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभले. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सितारामजी
मंत्री, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक देविदास सोनेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!