आपला जिल्हा

शिक्षकांनी चौकटीच्या पलीकडे जावून काम करावे-कवि गणेश शिंदे

-दीपस्तंभ प्रतिष्ठानने केला गूणवंत विद्यार्थ्यांचा गूणगौरव

सेलू ( प्रतिनिधी ) :प्रत्येक कूटूंबातील सकाळ दूध विक्रेत्याच्या आगमनाने होते.त्यावेळी दूध विक्रेता नियमीत ठरल्याप्रमाणे दूधाचे माप टाकत असतांना त्याकडे दूध घेणा-या व्यक्तीचे लक्ष नसते मात्र दूधाचे माप देवून दूध विक्रेत्याकडून आगाऊची धार किती मिळते याकडेच लक्ष असते अगदी त्याच प्रमाणे शिक्षण क्षेत्रात ग्यानदानाचे काम करणा-या प्रत्येक शिक्षकाने नियमित अभ्यासक्रमाशिवाय विद्यार्थ्यांना जास्तीचे काहीतरी दिले गेले पाहिजे म्हणजेच शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रात चौकटीच्या पलीकडे जावून काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रसिद्ध वक्ते कवी प्रा.गणेश शिंदे यांनी केले ते येथील साई नाट्यगृहात दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजीत गूणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी रविवार २३ जून रोजी बोलत होते.यावेळी प्राचार्य डाँ.विनायक कोठेकर,आमदार मेघना बोर्डीकर,संतोष पाटील,रोहिदास मोगल,मनिष बोरगावकर,रमेश पौळ,गूलाब ताठे,जयदत्त बावणे,डाँ.संजय रोडगे,रवि डासाळकर,अशोक अंभोरे,रामेश्वर राठी.राजाभाऊ देवकर आदींची प्रमूख उपस्थिती होती.विद्यार्थी व पालक यांच्या प्रचंड उपस्थीतीत मार्गदर्शन करतांना गणेश शिंदे म्हणाले की,प्रत्येकाने कोणत्याही गोष्टीचे अंधानूकरण न करता चिकीत्सा करून एवढेच नव्हे तर सारासार विचार करून निर्णय घेणे अपेक्षीत आहे कारण संपूर्ण जगात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत प्रत्येकाला आपल्यातील वेगळेपण ओळखता आले पाहिजे,तारतम्य ठेवून आयूष्य जगता आले पाहिजे .संकटावर मात करता आली पाहिजे आपल्या पूर्वजांचा इतिहास तपासला तर लढणं?काय असत,पेटून उठणं ?काय असत हे महाराष्टाच्या मातीकडून शिकाव असे भावनिक अवाहन बोलतांना त्यांनी केले.ते म्हणाले की,केवळ गूणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे विद्यार्थ्यांची गूणवत्ता नाही.ज्या दिवशी तूमच्या जिवनातील चांगूलपणा ओळखता येईल त्यांच वेळी जिवन जगणे सोपे होईल त्यामूळे प्रत्येकाने स्व:तला सिद्ध केले पाहिजे नोकरीच्यापूढे जावून उद्योगाकडे वळले पाहिजे शिक्षणातून स्वाभिमानी बनले पाहिजे तूमच्या आमच्या शिक्षणाला आता कोणत्याच भिंती उरल्या नाहीत जगाशी तूलना त्यामूळे नविन तंत्रग्यान शोधून स्विकारले पाहिजे तरच आपण जगाच्या स्पर्धेत टिकू शकतोल असे प्रखड मत प्रा.गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील गूणवंत सत्कार समारंभ प्रसंगी विद्यार्थी व पालकांनी खचाखच भरलेले साई नाट्यगृह पाहून शिंदे यांना संवाद साधतांना नाट्यगृहातील पंख्याच्या आवाजाने अडसर निर्माण होत होता त्यावेळी कार्यक्रमाच्या संयोजिक आमदार मेघना बोर्डीकर यांना प्रा.गणेश शिंदे म्हणाले की,ताई हे नाट्यगृह अतिषय सूंदर आहे मात्र या नाट्यगृहात वातानूकूलीत ची व्यवस्था नाही त्यामूळे यापूढे पालिका प्रशासनास सांगून नाट्यगृहात वातानूकूलीत ची विनंतीवजा सूचना यावेळी केली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार मेघना बोर्डीकर तर समारोप प्राचार्य विनायक कोठेकर यांनी सूत्रसंचलन कू.देवहूती गांजापूरकर व विजय चौधरी यांनी तर आभार मंजूषा सेलगावकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड .दत्तराव कदम, शंकर भोंडवे अशोक अंभोरे,अर्जून बोरूळ,गणेश काटकर,वनिता चाफेकर,गणेश सवने,शिल्पा मंत्री,रूपाली ठाकूर,कपिल फूलारी,संदिप बोकन,दत्ता तांबे,बाळू काजळे,जयसिंग शेळके, वाल्मीक खुळे प्रकाश शेरे,पप्पू शिंदे,विठ्ठल कोकर,प्रशांत ठाकूर आदींनी पूढाकार घेतला .शहरातील विविध स्पर्धा परिक्षा व अभियांत्रीकी स्पर्धा परिक्षेतील गूणवंतासह दहावी व बारावी विशेष प्राविण्य प्राप्त गूणवंताचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!