आपला जिल्हा

खासदार बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात महाविकास आघाडी ची रॅली

सेलू   ( प्रतिनिधी )  ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात निघालेल्या पदयात्रा ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आठवडी बाजार येथे सय्यद शहाबुद्दीन अवलिया यांच्या समाधीवर चादर चढऊन आशीर्वाद घेतला. तसेच मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी नागरिकांना आवाहन करत येत्या 26 तारखेला मशाल या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

आपले कार्य हीच आपल्या लोकप्रियतेची पावती असते. मा.खा.संजय जाधव साहेब हे कर्तृत्ववान आणि निष्ठावान खासदार आहेत. जनता जनार्दन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सर्वजण आपल्या पाठीशी उभे आहेत. विजयाची आपल्याला कसलीही काळजी नाही. प्रत्यक्ष ‘विजयच’ आपल्या सोबत उभा आहे. विजयराव भांबळे साहेबांच्या नेतृत्वात जिंतूर व सेलू विधानसभा मतदारसंघातून तसेच सेलू शहरातून मताधिक्य आपणास देऊ. आपला मोठा विजय होईल,” असा विश्वास यावेळी सेलू शहरातील नागरिकांनी व्यक्त केला.
या वेळी साईबाबा नागरी बँक चे अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अशोक काकडे, राजेंद्र लहाने, विनोद तरटे, इरफान जमीनदार, सुधाकर रोकडे, मुक्तार खान, इमत्याज खान, मनिष कदम, शेख दिलावर,मिलींद पवार , विशाल देशमुख, संजय साडेगावकर, मिलींद सावन्त, मजीद बागवान, शेख समीर, गौस लाला, परवेज आदी आघाडी चे नेते उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!