आपला जिल्हा

कै.रा.कि.कान्हेकर शारदा विद्यालयाचा निकाल 85.71%

सेलू (प्रतिनिधी )मार्च 2024 मध्ये संपन्न झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयाचा निकाल 85.71% ऐवढा लागला असुन उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.


या परीक्षेसाठी शाळेतील एकूण अठ्ठावीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये शेख रिहान अहमद 82.20%, गिरी श्रीकृष्ण बाबुराव 77.40%, सोळंके आकाश प्रभू 77.20%, कोरडे यादव दत्तराव 75% हे विशेष प्राविण्यासह, तर कुकडे कृष्णा तानाजी 74.80%, जवळकर आदित्य संदीप70.20%, उगले वैभव भारत 69.40%, कारके पुजा शाम63.20%, शेख अल्फिया रियाजोद्दिन64.20%, शेख जुनेद मकसुद 60.40% असे एकूण ४ विद्यार्थी विशेष प्राविण्य, सहा विद्यार्थी प्रथम श्रेणी सात द्वितीय श्रेणी व सात विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थी , पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष मुंजाभाऊ भिसे, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, सहसचिव सुनील डख, जेष्ठ संचालक प्राचार्य डॉ. ए.एम.डख,जयप्रकाशजी बिहाणी, रामनाना पाटील, श्रीबल्लभजी लोया,अशोकजी मंत्री, दिपकराव खराबे,प्रल्हादराव कान्हेकर,प्रफुल्लचंद्र बिनायके,नंदकिशोरजी बहिवाल, प्रशासकीय अधिकारी चंद्रशेखर नावाडे,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक डी.डी.शिंदे ,भरत रोडगे, चारठाणकर एस एच,सुभाष मोहकरे,अभिमान पाईकराव,आर व्ही चव्हाण, विजय हिरे, एस. एम. जुमडे,बी आर साखरे ,सौ उषा कामठे,सौ सिमा उंडे,आनंद देवधर,बालासाहेब टरपले,नानासाहेब भदर्गे ,विजय अंभुरे, श्रीमती भारती मुळे आदींनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!