आपला जिल्हा

यासेर उर्दू माध्यमिक शाळेचा निकाल 96.82 % दहावी परीक्षेत घवघवीत यश आयेशा उमीज चा पहिला क्रमांक

सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद च्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इ. 10 वी बोर्ड परीक्षेत

सेलू येथील गौरव सेवाभावी संस्था सेलू संचलित यासेर उर्दू माध्यमिक शाळा सेलू या शाळेचा निकाल 96.82 % लागला आहे . यातून शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे.पठाण आयेशा उमीज मुबीन खान विद्यार्थिनीने 92.40 %गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे व शेख महेक संगीर 87.40 % घेऊन द्वितीय क्रमांक घेतला आहे तृतीय क्रमांक आदींना मजदी शकील अहेमद खान या विध्यार्थिनीने 83.00 % टक्के गुण प्राप्त केले आहेत . व शाळेचे प्राविण्य प्राप्त विध्यार्थ्यांमध्ये 1) शेख रेहान शफी 81.60 % 2) पठाण अरीना फातेमा मुबीन खान 80.80 % 3) पठाण मुस्तफा गुलाम अली खान 80.20 % 4) शेख हुरैन शफी 79.00 % 5 ) मोटलिया मिसबाह इरफान 76.60 % जोया खानम निसार अहेमद 73.40% आहे.आजपर्यंत उर्दू माध्यमाच्या शाळेतील 63 विध्यार्थी 10 वी परीक्षेत बसविणारी यासेर उर्दू शाळा ही एकमेव शाळा असून 63 हा सेलू शहरातील उर्दू शाळेचा उच्चंक असून कमी कालावधीत यासेर उर्दू शाळेने शिक्षण क्षेत्रात उच्च प्रगती केली आहे. सध्या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे या साठी 2कोटी रुपये खर्च लागत आहे व 18 खोल्या वर्ग होणार आहेत संस्था अध्यक्ष रहीम खान यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रहीम खान, मुख्याध्यापक टी. एस. कास्मी शिक्षक सय्यद खिजर अहेमद, फझल सिद्दीकी सर, फहेमीदा मॅडम, जहीर अन्सारी सर, खान कौसर बेगम, शेख अस्लम सर गडदे सर, राऊत सर, वानखेडे सर गट शिक्षणाधिकारी राऊत साहेब,भुजंग थोरे सर, अजमत खान, वसीम खान, इमरान खान यादीनी सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!