आपला जिल्हा

शेतकऱ्यांना मिळाले सेंद्रिय योगिक शेतीचे धडे

⬛ ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेलू शाखेचा 32 वा वर्धापन दिना निमित्त उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेलू शाखेचा 32 वा वर्धापन दिन सोमवार दि 20 मे रोजी साजरा करण्यात आला . वर्धापन दिनाचे औचित्य साधून मानवाच्या आत्मिक विकासाबरोबरच ते शरीरिक दृष्ट्याही संपन्न झाले पाहिजे. यासाठी विषमुक्त शेती होणे गरजेचे आहे . याबद्दल जाणीव जागृती व्हावी म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली विभागातील मान्यवरांची उपस्थिती होती.

जसा अन्नाचा परिणाम मनावर, मनाचा विचारावर आणि विचाराचा स्वास्थ्यावर होतो. ही श्रृंखला अखंडित ठेवण्याचे काम शेतकरीच करू शकतो. कोविड काळामध्ये जग बंद पडलं होतं पण शेती बंद पडली नाही. शेतकऱ्यांनी प्रत्येकाला अन्न पुरवण्याचे काम अहोरात्र केले आहे. शासन स्तरावरून सेंद्रिय शेतीसाठी असलेल्या योजना, सुविधा याबद्दल मार्गदर्शन मान्यवरांनी केले. सदरील कार्यक्रम मा. बिके सविता बहिणजी यांच्या नेतृत्वात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीके तांदळे भाई , सोमेश्वर गिराम,भगवान इंगोले, , मंत्री साहेब , , पठाण साहेब ,मीनाताई बोर्डीकर , प्रा. सूर्यवंशी साहेब, इंजि. कोलते साहेब,प्रा. गोरे सर, राजहंस खरात,बालासाहेब गजमल, डॉ.सतीश मुळे ,सुनील पोळ , , शांता बहनजी, अनिता बहिनजी , शिल्पा बहिणजी, दिपा बहीणजी , वैशाली बहीणजी ,सीमा बहिनजी ,राधा बहीणजी इ. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईश्वरीय परिवारातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. सेंद्रिय योगीक शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी शासन स्तरावरवरुन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांची मदत घेतल्यास या अभियानाला अधिकची मजबुती आल्याशिवाय राहणार नाही असे मान्यवरांनी प्रतिपादन केले. शेवटी ब्रह्मा भोजनानंतर सारिका बहिण जी यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!