आपला जिल्हा

हाफिज मोहम्मद अफजल यांचे कार्य प्रेरणादायी – अशोक काकडे

सेलू ( प्रतिनिधी ) माणूस किती जगला या पेक्षा तो कसा जगला याला फार महत्व आहे. त्याच प्रकारे हाफिज मोहम्मद अफजल यांनी आपल्या जीवनात आपलं संपूर्ण आयुष्य धार्मिक शिक्षण, सामाजिक शैक्षणिक कार्यास समर्पित केलं या मुळे माणूस किती जगला या पेक्षा तो कसा जगला याला फार महत्व असल्याचे प्रतिपाद माजी जि. प. सभापती अशोक काकडे यांनी शोकसभा प्रसंगी केले.

रविवार दि.12 मे रोजी हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथे सेलू पत्रकार संघ व मित्रमंडळ तर्फे हाफिज मोहम्मद अफजल यांच्या शोकसभेच आयोजन करण्यात आले होते.
या वेळी व्यासपीठावर यासेर उर्दू शाळेचे संस्थापक अद्यक्ष रहीम खान पठाण, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघांचे सुरेश नाईकवाडे,मौलाना मूखतदिर,मौलाना खाजा सहाब कासमी यांची उपस्थिती होती.
हाफिज मोहम्मद अफजल यांना सेलूतील वकील संघ, पत्रकार संघ, व्यापारी संघातर्फे आदरांजली वाहन्यात आली.
या कार्यक्रमास मूख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे osd राहूल देशपांडे, अड.श्रीकांत वाईकर, अड,किशोर जवळेकर, अड.अनिरूध्द जोशी अशोक फोपसे ,माजी सभापती रवि डासाळकर, डाॅ.अरविंद बोराडे ,सूरेंद्र गिल्डा, मिलिंद पवार सह सेलू शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी, पत्रकार यांनी उपस्थिती होती.

कार्यकर्माचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी तर आभार पत्रकार मोहम्मद इलियास यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!