आपला जिल्हा

पर्यावरण संवर्धनासाठी बोलून काही होणार नाही तर कृती करणे आवश्यक; केमापूरकरांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा संकल्प

सध्या ३५० जीवंत झाडांची घेतली जातीय काळजी

सेलू ( प्रतिनिधी ) प्रचंड तापलेल्या उन्हामुळे जिकडे तिकडे दिसणारी रखरख,सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष यावर समाज माध्यमातून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व सांगणारे संदेश फिरताना आपण पहातो पण फक्त पर्यावरण संवर्धनासाठी बोलून काही होणार नाही तर कृती करणे आवश्यक आहे आणि हे कृतीशील पाऊल सेलू तालुक्यातील केमापूर येथील गावकऱ्यांनी ता.११ रोजी टाकले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमापूर येथे दोन वर्षांपूर्वी घनवन प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे.शिक्षकांनी कधी विद्यार्थिनींच्या मदतीने तर कधी टॅंकरने पाणी देऊन वृक्षसंवर्धनाचे काम केले,परंतु सध्या पाणी टंचाईमुळे घनवन प्रकल्प सुकू लागलेला पाहून नामदेव आंधळे यांनी चारशे फुट पाईप अंथरूण त्यांच्या बोअरवेलमधून झाडांना पाण्याची व्यवस्था करून दिली.सुकू लागलेला घनवन प्रकल्प आता उन्हाळ्यातही बहरेल पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यासाठी अंकुश आंधळे,कैलास आंधळे,अक्षदा भास्कर गुठ्ठे, अक्षदा गोविंद गुठ्ठे,पुनम गुठ्ठे,अशोक बुधवंत ,आदिनाथ बुधवंत,प्राजक्ता साळवे मदत करत आहेत.यासर्वांनी उन्हाळ्यात झाडांना पाणी देऊन वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला आहे.

भविष्यात केमापूरकरांच्या पर्यावरण संवर्धनाचा आदर्श लोक नक्कीच घेतील.वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करून दिल्या बद्दल गावकऱ्यांचे धन्यवाद

शरद ठाकर
मुख्याध्यापक केमापूर

Related Articles

Back to top button
Don`t copy text!