आपला जिल्हा

सेलू शहरातील स्वच्छता वीज समस्या बाबत आमदार मेघना बोर्डीकर यांनी घेतला आढावा

नगरपरिषद, विजवितरण अधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) आज सेलू रामप्रसाद बोर्डीकर यांच्या निवासस्थानी सेलू शहरातील स्वच्छता वीज समस्या बाबत आमदार मेघना बोर्डीकर यांनी आढावा घेतला.

सेलू शहरातील तुंबलेल्या नाल्या मच्छर फवारणी आणि हेमंत नगर झाकीर हुसेन नगर शिवाजीनगर नाल्यालगत चा भाग या ठिकाणची नाल्याची साफसफाई करण्यात यावी व तसेच सेलू शहरात लोमकळलेल्या तारा तिच्या खांद्यावर आलेले झाडे यांची कटाई करावी व लाईन जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी दिल्या.

या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव ओ.एस. मल्लिकार्जुन स्वामी, स्वच्छता निरीक्षक व महावितरण चे प्रवीण थोरात यांची उपस्थिती होती.

यावेळी एडवोकेट दत्तराव कदम अशोक अंभोरे कपिल फुलारी गणेश काटकर संदीप बोकन गणेश गोरे कृष्णा गायकवाड अशोक शेलार आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!