आपला जिल्हा
बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषि केंद्रांवर कडक कारवाई करावी
जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक संपन्न

परभणी, दि. 29 ( प्रतिनिधी ) : खरीप हंगामात शेतक-यांना बोगस निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषि केंद्रांवर कृषि विभागाच्या भरारी पथकांनी आकस्मिक तपासणी करून बोगस बि-बियाणे, खते, किटकनाशके विक्रेत्यांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम सन २०२४ जिल्हास्तरीय आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते.




