आपला जिल्हा

सेलू नगर  पालिकेचे वराती मागून घोडे.. पाईपलाईन दुरुस्ती साठी सिमेंटरोड चा बट्याबोळ…..

⬛जबाबदार अधिकाऱ्याकडून खर्च वसूल करण्याची मोरया प्रतिष्ठानची मागणी.

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शहरात नागरिकांच्या सोईसाठी अनेक विकासकामे केली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मदरसा पर्यंत असलेला सिमेंट रस्ता वालूर नका जवळ फोडून नगर परिषदेकडून पाईपलाईन दुरुस्तीची काम गेल्या अनेक दिवसा पासून सुरु आहे.हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेवून पूर्ण केले गेले असते तर आज ही तोडफोड वाचली असती त्या मुळेच की काय नगर  पालिकेचे वराती मागून घोडे.. म्हणण्याची वेळ नागरिकांवार आली आहे.

तसा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करून नवीन राज्य महामार्ग गेल्यावर्षी तयार करण्यात आला होता.या राज्य महामार्गावर दळण वळण मोठ्या प्रमाणत वाढलेले असून नागरी वस्ती मुळे दरदिवशी अनेक अपघात होत आहेत.त्यातच भरीस भर म्हणून वालूर नाका परिसरात जलवाहिनी जोडणीचे काम मागील दीड महिन्यापासून हाती घेण्यात आले असून नवीन झालेल्या रोडवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नसून नवीनच झालेल्या राज्य महामार्गाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे.हा राज्य महामार्ग बनविण्याचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अंतर्गत असलेल्या जलवाहिनीचे काम त्याच वेळी हाती घेवून पूर्ण केले गेले नाही त्यामुळे सद्यस्थितीत नवीन झालेला रोड खोदून जोडणी करण्यात येत आहे.या मनमानी कारभारामुळे नागरिकांकडून गोळा केलेला पैशाचा अपव्यय होत असून गैर जबाबदारीने वागणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल करण्यात यावा अशी मागणी मोरया प्रतिष्ठान व सेलू शहरातील नागरिकांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!