आपला जिल्हा

नूतन विद्यालयाच्या 1988 बॅच नी केली वैद्यकीय शिक्षणासाठी 66 हजार रुपये आर्थिक मदत.

सेलू (प्रतिनिधी ) नूतन विद्यालय सेलू 1988 च्या वर्ग मित्रांनी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला . आपल्या वर्ग मित्र श्याम दळवे यास मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी 66 हजार रुपये आर्थिक मदत करून वार्षिक खर्च देण्यात आला बालपणच्या मिञांनी आज 36 वर्षापासून मैञी कायम ठेवून, मिञांच्या सुख दुःखात सहभागी होऊन मैञीचा आनंद द्विगुणित केला.

गणेश श्याम दाळवे यांनी नूतन महाविद्यालय सेलू येथील 12 वी विज्ञान शाखेत 83% गुण घेतले व नीट परीक्षेत 672 गुण घेऊन. यास वैद्यकीय शिक्षणासाठी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे प्रवेशासाठी आर्थिक मदत दिली.
गणेश दाळवे याची घरची परिस्थिती बिकट असताना , कोणतीही खाजगी शिकवणी न लावता तसेच वडिलांचे दहा बाय दहाचे वेल्डिंगचे दुकान असून त्या पाठीमागे एका खोली मध्ये राहतात.त्या खोलीमध्ये दुकानाचा वेल्डिंगच्या कामाचा कायम आवाज यायचा. अशा परिस्थितीमध्ये त्याच घरामध्ये त्याने नीट परीक्षेमध्ये 672 गुण घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशासाठी पात्र ठरला.
नूतन विद्यालय सेलू 1988 दहावी बॅचच्या वर्गमित्रानी मदतीचा हात दिला.
ॲड.मुकुंद चौधरी, शरद मगर, डॉ. सचिन मंत्री डॉ. आश्विन भरड बाबासाहेब पानझाडे, सुनील वेदपाठक ,किरण दिग्रसकर, भाऊसाहेब आळणे, प्रल्हाद हुंबे, डॉ. महेश चौधरी, प्रजित वांगीकर, दि पक सावंगीकर, सतीश दरगड, डॉ. संजय दराडे, कालिदास देशपांडे, सुमन जोशी, ॲड अनुम निकम, डॉ. दत्ता मोटेगावकर, डॉ.शिवाजी निलवर्ण, डॉ.प्रल्हाद वांगीकर, डॉ .दीक्षित ऋषिकेश, श्रीराम जाजू, शेख जहीर, गणेश माळवे, सुरेश भांडवले,भागवत इंद्रोके, अनंता चौधरी, डॉ.रामेश्वर साबळे, अनिस कुरेशी.मनिष कदम, डॉ.अश्वमेध जगताप, दत्ता चव्हाण, नारायण हरकळ, डॉ.अनिल चौधरी, अनिल कांचन या सर्वांनी मदतीचा हात दिला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!