आपला जिल्हा

विदयार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्यासाठी 10 हजारांची देणगी

सेलू ( प्रतिनिधी ) येथील सारंगी गल्ली देवस्थानचे विश्वस्त तथा सेवानिवृत्त कर्मचारी श्री सुभाषराव काळे यांनी कै.सौ.राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या साठी 10 हजार रुपयांची देणगी दिली.
आज सोमवार दिनांक 16 जून रोजी सन 2025-26 नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश महोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रल्हादराव कान्हेकर , प्रमुख अतिथी म्हणून बबन आप्पा झमकडे , मुख्याध्यापक बी.आर.साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत रोडगे , सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर संदीप जुमडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक डी.डी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास चव्हाण,अभिमान पाईकराव, विजय हिरे, सौ उषा कामठे , नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, श्रीमती भारती मुळे, साडेगावकर, फुलारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!