आपला जिल्हा

हाजी शफिख अलिखा यांच्या चाहत्या तर्फे सत्कार

सेलू ( प्रतिनिधी ) दि. 20एप्रिल 24रोजी गुलमोहर कॉलनी येथील सामाजिक प्रतिष्ठित नागरिक श्री हाजी शफिख अलिखा यांना कै. अण्णा साहेब काकडे सेवा भावी सस्था च्या वतीने सन्मान कर्तवताचा या मध्ये सन्मान केल्या बद्दल व महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ जालना अभियंता श्री हाजी अनिस कुरेशी (इंजिनिअर )याचा मुलगा चि. डाँ आफताब कुरेशी याने वैद्यकीय परीक्षा एम बी बी एस उत्तीर्ण झाल्या बद्दल तसेच जिल्हा परिषद शाळा हदगांव पावडे येथील कार्यरत असलेले शिक्षक श्री मौजम सर यांनी नुकतेच पि एच डी साठी आपला शोध निबंध सादर केल्या मुळे या तिघां चा सत्कार करण्यात आला या प्रसंगी मुस्लिम एजयुकेशनअँड वेलफेअर सोसायटी चे सदस्य श्री महेमूद सर, निसार पठाण, शेख शमशोद्दीन,इमामोद्दीन सर, इम्रान कुरेशी, जावेद घोरी,, हारून सर जकी सर, रफिक सर, पठाण रशीद खान, शेख असगर यांची उपस्थिती मध्ये करण्यात आला कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री महेमूद सर यांनी केले.
भविष्यात याच प्रमाणे शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बंधु-भगिनींचा गुणगौरव करण्यात येणार असुन, सदरील समिती तर्फे शैक्षणिक गुणवत्तेसह स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!