
सेलू ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने संस्था वर्धापनदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेले सात दिवसीय नूतन नाट्य प्रशिक्षण शिबिर बुधवार ( दि. १८ ) रोजी साई नाट्य मंदिरात शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी केलेल्या धनंजय सरदेशपांडे लिखित ‘ क्लोन’ आणि कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेचे नाट्य रुपांतर असलेल्या ‘ पिशी मावशी’ या दोन नाटीकेच्या सादरीकरणाने उत्साहात संपन्न झाले.




