आपला जिल्हा

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते उद्घाटन

परभणी, दि. 27 ( प्रतिनिधी ) : गंगाखेड तालुक्यातील मौजे वाघलगाव येथील शेतकरी मारोती घनवटे यांच्या शेती मालाचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते करण्यात आले.

मौजे गोपा येथील शेतकरी ग्यानदेव किशन कदम यांचे शेती पिकाचे प्रातिनिधिक स्वरुपात रब्बी हंगामातील हरभरा या पिकाची ई-पिक पाहणीची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली तसेच सदर शेतकऱ्याचे शेतातील कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या आमराई मधील कापूस या अंतरपिकाची पाहणी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी केली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसिलदार प्रदिप शेलार, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी संतोष इप्पर, मंडळ कृषी अधिकारी पी.आर.निरस, कृषि पर्यवेक्षक शंकर रेंगे, एम.एस.देशमुख, कृषी सहायक पी.व्ही. मतलाकुटे तसेच ग्रामस्थ शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!