आपला जिल्हा

काम करते रहो, लडते रहो; आपके बलिदान का आपको जरुर फल मिलेगा – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला राजेश भैय्या विटेकर यांना शब्द

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून करून दिला संवाद

परभणी (प्रतिनिधी) – परभणी लोकसभेत निवडणूक जिंकण्याची क्षमता असूनही पक्षनिष्ठेसाठी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांचे आज परभणी येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडभरून कौतुक केले. *तुम्ही लढत रहा, तुमच्या या त्यागाचे फळ तुम्हाला नक्किच मिळेल, असे मोदीजी राजेश विटेकर यांना म्हणाले. या संवादाची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.*

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती, या ठिकाणी जवळपास राजेश विटेकर यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेव जानकर यांना मिळाल्यामुळे या ठिकाणचे उमेदवार राजेश विटेकर यांना माघार घ्यावी लागली. अजितदादा पवार यांच्यावर असलेल्या निष्ठेपोटी राजेश विटेकर यांनी विजयाची खात्री असतानाही कोणतेही हेवे देवे न करता आपली उमेदवारी मागे घेत श्री महादेव जानकर यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयासाठी ते प्रचारात पुढाकार घेत आहेत.

याच मतदारसंघात मागील वेळी राजेश विटेकर हे केवळ 40000 मतांनी पराभूत झाले होते. त्यावेळी वंचित आघाडीने घेतलेल्या दीड लाख मतामुळे विटेकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परभणी येथे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा संपल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विटेकर यांच्या योगदानाची व त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण ठेवत सभा संपल्यानंतर राजेश विटेकर यांना जवळ बोलावून घेतले. सर्वांनी एकत्रित रित्या नरेंद्र मोदींसह सभेला संबोधित केल्यानंतर विटेकर यांची श्री फडणवीस यांनी श्री मोदी यांच्यासोबत ओळख करून दिली. इतकेच नव्हे तर हे याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती, तेव्हा चाळीस हजार मतांनी आणि वंचित ने केलेल्या मत विभाजनामुळे त्यांचा पराभव झाला, असे सांगितले. यावेळी ही त्यांचा विजय निश्चित असताना आणि त्यांना उमेदवारी निश्चित झाली असताना त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले.

फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर *मोदी यांनीही राजेश विटेकर यांना जवळ घेत पाठीवर हात थोपटत त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. ‘तुम काम करते रहो, लढते रहो, हम तुम्हारे साथ है, आपके बलिदान का फल जरूर मिलेगा’ अशा शब्दात त्यांचे कौतुक केले!

आजच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज सभा संपल्यानंतर राजेश विटेकर यांच्या व मोदीजींच्या मध्ये झालेल्या संवादाची क्लिप समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि राजेश विटेकर समर्थकांच्या व्हाट्सअप स्टेटस वर आणि सोशल मीडियामध्ये ही रील सध्या धुमाकूळ घालत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!