आपला जिल्हा

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाची कास धरून विकास साधा : दिगंबर फासाटे

सेलूतील नूतन विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) जीवनात सर्वार्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर अभ्यासाला पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरून विकास साधावा, असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जय जय स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे यांनी केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर योजने अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत शुक्रवारी, ९ फेब्रुवारी रोजी आयोजित नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून फासाटे बोलत होते. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण लोया होते. प्रमुख पाहुणे सिनेअभिनेते अनुज ठाकरे संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, दत्तराव पावडे, प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष आरती पांडव, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिक ठाकर, हिमांशी जैन यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
अनुज ठाकरे यांनी मनोगतातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मोठ्यांचा व शिक्षकांचा सन्मान ठेवला पाहिजे. भावी वाटचालीसाठी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरते, असे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.लोया यांनी शरीरासोबतच मन सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे नमूद केले.
डॉ.लोया यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, अमृतायन स्मरणिका व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले. प्रारंभी मानसी दलाल, सिध्दी रोडगे या विद्यार्थिनींनी जात्यावर ओवी गाऊन, तर राजनंदिनी निकम, पल्लवी गजमल, सिध्दांत जवादे या विद्यार्थ्यांनी काव्यरूपाने पाहुण्यांचा परिचय दिला. किरण देशपांडे यांनी अहवाल सादर केला. सच्चिदानंद डाखोरे, गिरीश दीक्षित आणि विद्यार्थ्यांनी अशोक लिंबेकर रचित ‘ माझी शाळा सुंदर शाळा ‘ गीत सादर केले. सूत्रसंचालन वैष्णवी पिंपळगावकर, हर्ष पिंगळे यांनी केले. डॉ.काशिनाथ पल्लेवाड, शिल्पा बरडे, गणेश माळवे, गोपाल आम्ले यांनी प्रमाणपत्र वितरण संचालन केले. देविदास सोन्नेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सुधाकर फासाटे, मनीष आजगावकर, मधुकर फासाटे, रामेश्वर व परमेश्वर फासाटे, वैभव जाधव, पवन फासाटे, ईश्वर फासाटे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालकांची मोठी उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

 सेलू येथील नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी दिगंबर फासाटे, अनुज ठाकरे, डॉ.सत्यनारायण लोया, प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!