आपला जिल्हा
खासदार बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात महाविकास आघाडी ची रॅली

सेलू ( प्रतिनिधी ) ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार खा.संजय जाधव यांच्या प्रचारार्थ सेलू शहरात निघालेल्या पदयात्रा ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आठवडी बाजार येथे सय्यद शहाबुद्दीन अवलिया यांच्या समाधीवर चादर चढऊन आशीर्वाद घेतला. तसेच मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी नागरिकांना आवाहन करत येत्या 26 तारखेला मशाल या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.




