आपला जिल्हा

रक्तदान शिबिरांचे आयोजन करून पेढ्यांमध्ये साठा वाढवा : डॉ. लखमावार

परभणी,दि. १६ ( प्रतिनिधी ) : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असून, जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रक्तदान करून गरजूंचे जीव वाचविण्यासाठी पुढे यावे. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती गरज ओळखून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.

सद्या रक्तकेंद्रात थॅलेसेमिया व इतर रुग्णांची वाढती संख्या आणि रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्यामुळे रक्तसाठा व रक्त घटकांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकास रक्तपिशवी मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे. तरी जिल्ह्यातील विविध समाज घटकांनी, सामाजिक संस्थांनी, विविध पक्ष-पदाधिकाऱ्यांनी आपल्या संस्थेच्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन रक्तकेंद्रास सहकार्य करावे. जेणे करून रुग्णसेवा सुरळीत चालू राहून गरजू रुग्णांचे जीव वाचविण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागेश लखमावार यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!