आपला जिल्हा

न्यू हायस्कूलचा निकाल उंचावला

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल मागच्या वर्षीच्या तुलनेत उंचावला आहे.

यावर्षी एकूण प्रविष्ट 83 विद्यार्थ्यांपैकी 72 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचा एकूण 87% निकाल लागला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी निकालामध्ये आपला ठसा उमटवला आहे. सोनम पौळ, आरती काकडे, आशिष मनेरे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या गावाकडे रवळगाव व रायपूर या ठिकाणी जाऊन शाळेचे मुख्याध्यापक के व्ही मोरे, पर्यवेक्षक धनंजय भागवत, सावंत ए एस, गाडेकर रामेश्वर, मंजुषा बोराडे यांनी गुणगौरव केला. याप्रसंगी विद्यार्थी, पालक व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते. शाळेच्या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे, संतोष कुलकर्णी, लता गिल्डा, प्रा विठ्ठल डख ॲड अशोक फोपसे आदींनी विद्यार्थी,शाळेचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!