आपला जिल्हा

श्री.के.बा.विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी संजय धारासुरकर

सेलू(प्रतिनिधी)दि 06 येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकपदी संस्थेने जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक संजय धारासुरकर यांची नियुक्ती केली आहे.

मुख्याध्यापक बालासाहेब हळणे हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याने 1 मे पासून संजय धारासुरकर यांची निवड करण्यात आली आहे.1997 पासून धारासुरकर हे शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.अनेक क्रीडा स्पर्धा आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा असतो.धारासुरकर यांच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्रासह शैक्षणिक बाबींमध्ये नक्कीच चांगला बदल पहायला मिळणार आहे.त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिरुद्ध जोशी,उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,सचिव महेशराव खारकर,सहसचिव अभय सुभेदार,जयंत दिग्रसकर,ललित बिनायके,ऍड.किशोर जवळेकर,विष्णुपंत शेरे,रामेश्वर राठी,प्रवीण माणकेश्वर,डॉ प्रवीण जोग,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके आदींसह शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!