आपला जिल्हा

विमा हप्त्यावरील जी.एस.टी. रद्द करा- विमा कामगार संघटनांची मागणी

⬛ परभणीचे खासदार संजय जाधव यांना दिले निवेदन

परभणी ( प्रतिनिधी ) विमा कामगार संघटना तर्फे परभणीचे खासदार संजय जाधव यांना विमा हप्त्यावरील जी.एस.टी.रद्द करावा, प्राप्ती कराच्या नव्या कर प्रणालीमध्ये विमा हप्त्याचे रक्कमेला बजावट द्यावी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील चारही सर्वसाधारण विमा कंपन्याचे एकत्रिकरण करावे या मागण्याचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कॉ. राजेश भालेराव, कॉ. शमशोद्यीन शेख, कॉ. देविदास नागेशी, कॉ. राजेंद्र कुलथे, कॉ. रामा धोत्रे, आदी उपस्थित होते. आपण या मागन्यांचा सरकारकडे पाठपुरावा करु असे आश्वासन खासदार जाधव साहेब यांनी शिष्टमंडळाला दिले. विमा धारकांच्या हितासाठी म्हणून ऑल इंडिया इंशुरन्स एम्पलॉईज असोसिएशन या संघटनाच्या आव्हानानुसार देशातील सर्व खासदारांना भेटून त्यांना असे निवेदन देण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!