आपला जिल्हा

स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत तुलशी परभणी उपांत्य फेरीत तर यंग लेव्हन विजयी.

राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा

सेलू (प्रतिनिधी )सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४

नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 17 जानेवारी 2024 बुधवार वार रोजी सकाळी सञात तुलशी परभणी वि. विराट नांदेड दरम्यान ने परभणी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 220 धावात/7 बाद झाले यात संतोष व्यवहारे 34,पवने 61धावा केल्या निखिल मदस ने 33 धावा केल्या नांदेड संघाच्या वतीने गोलंदाज परम काळे यांनी 3 गडी , संदिप पाटील, आदर्श यादव ,1-1 गडी बाद केले.तर प्रतिउत्तर देताना नांदेड संघाने 18 षटकात सर्व गडी बाद 196 धावा केल्या . यात संदिप पाटील 45 ,धावा, आदर्श यादव 56 धावा करत दमदार फलंदाजी प्रदर्शन केले . तुलसी परभणी घ्या वतीने भेदक मारा सुफियांन अहमद 4 गडी बाद केले तर सहिल परोहित व नवनाथ लोखंडे 3-3 गडी बाद करत विजय खेचून आणला. सामन्याचा सामना वीरतुलसी परभणीचा सोफियान अहमद
विशाल शेळके गुत्तेदार यांच्या वतीने सामनावीर पुरस्कार देण्यात आला.तुलसी परभणी संघाने 24 धावाने विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुपारच्या सत्रातील सामना यंग इलेव्हन संभाजीनगर विरुद्ध लक्ष्मी स्पोर्ट्स परतुर यंग इलेव्हन संभाजीनगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक करताना जेष्ठ पञकार नारायण पाटील, संतोष कुलकर्णी, विनायक खंडागळे , नितीन मंडळाचे सचिव संदीप लहाने, काष्टे महाराज, कर्णधार उपस्थित होते.
संभाजीनगर संघाने 20 षटकात 193/7 गडी बाद झाले यात अमोल पाठक याने 71 धावात चौफेर फटकेबाजी करत करताना 7 षटकार 4 चौके मारले. स्वप्निल खडसे 35, तर स्वप्निल चव्हाण 25 धावा केल्या.
परतूर संघाच्या वतीने गोलंदाजी करताना करण डुकरे 2 गडी तर अमोल साळवे 3 गडी बाद केले.
यांचे प्रतिउत्तर देताना परतूर संघाने 17 षटकात सर्व बाद 134 धावा केल्या यात निरंजन चव्हाण 19, फराहन लाहमदी 46, विजय बोराडे 28 धावा करत तंबुत परतले.यंगलेव्हन छ. संभाजीनगर च्या भेदक मारा कार्तिक बलिय्याय 3 गडी तर शुभम मोहिते , अलीम खान 2-2 गडी बाद करून 59 नावाने विजय प्राप्त केला.
सामनावीर पुरस्कार अमित पाठक यास रामेश्वर गटकळ यांच्या हस्ते देण्यात आला.
पंच प्रसाद कुलकर्णी, आसेर सिद्दीकी तर समालोचन अनिल शेळके, शेख यासेर यांनी केले.
संदीप लहाने,राजेश राठोड,अभी चव्हाण,मसूद अन्सारी,प्रमोद गायकवाड, गजानन शेलार, दीपक निवळकर,झिशान सिद्दीकी, सलमान सिद्दीकी,मोईन शेख,मोसीन सय्यद,अजय काष्टे, मंगेश गाडगे,सुरज शिंदे, श्रीशैल्य फटाले,आदित्य आडळकर,बंटी सोळंके,नाविद शेख, फाजील बागवाण,कफील बागवान,कपिल ठाकूर,सोनाजी पौळ,आलीम पठाण,वैभव सरकटे, माझ अन्सारी,श्लोक लिंगे आदी परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!