आपला जिल्हा
सेलू जैन समाजाचा शांततेत मोर्चा काढून आक्रोश — ‘सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे’ विषयक निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर

सेलू :(प्रतिनिधी) “सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, पुणे” या धार्मिक व सामाजिक मालमत्तेशी संबंधित विषयात पारदर्शकता, ट्रस्ट डीडमधील तरतुदींचे पालन तसेच प्रशासकीय कार्यवाहीत निष्पक्षता राखावी, या मागणीसाठी सेलू येथील संपूर्ण जैन समाजाच्या वतीने आज दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी शांततेत मोर्चा काढण्यात आला.

सकाळी १०.३० वाजता श्री जैन मंदिर येथे समाजबंधू मोठ्या संख्येने एकत्र जमले. समाजाच्या ऐक्याचे दर्शन घडवत सर्वजण एकत्रितपणे शांततेच्या मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.
सकाळी ११.०० वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून निवेदन सादर करण्यात आले.
समाजाचा हा मोर्चा पूर्णतः अनुशासित, मौन व शांततेच्या वातावरणात पार पडला.निवेदन श्रीकृष्णा देशमुख (नायब तहसीलदार) यांनी स्वीकारले.
निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये निलेश बिनायके (अध्यक्ष), अशोक काला, रमेश काला, सतीश गंगवाल, जीतेन्द्र गंगवाल, अशोक वानरे, ऋषभ काला, ईश्वर जैन, रोहित काला,पुनमचंद खोना यांच्या सह समस्त समाज बांधव उपस्थित होते.
मोर्चा व आंदोलनात उपस्थित आणि सक्रिय राहिलेले समाजबंधू – अशोक भंडारी, महावीर आँचलिया, महावीर गंगवाल, नेमिनाथ दुत्ते, सुमीत काला, परेश संगई, रुपाली गंगवाल, भारती काला, रूपा काला, सुनीता काला,गादिया,चिराग रूपडा तसेच इतर अनेक जैन बांधव व भगिनीवर्ग अत्यंत उत्साहाने सहभागी झाले.
या मोर्चाचे आयोजन आणि यशस्वी पार पडण्यासाठी निलेश बिनायके, ऋषभ काला,आशिष बिनायके , दीपक बिनायके, जितेंद्र गंगवाल,देवेंद्र काला,गीताराम कोकणे, विश्वंबर सर यांनी विशेष प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था अत्यंत सुरळीतरीत्या पार पडली.
सेलू जैन समाजाने दाखवलेली एकजूट, अनुशासन आणि शांततेचे पालन हे संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरले आहे. समाजाच्या मागण्या प्रशासनापर्यंत योग्यरीत्या पोहोचवून, ट्रस्टच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता येण्यासाठी हा मोर्चा एक पाऊल ठरावा अशी अपेक्षा निलेश बिनायके यांच्या द्वारे व्यक्त करण्यात आली.
जैन समाज, सेलू सेठ हीराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या पुणे येथील मालमत्तेच्या विक्री संदर्भात झालेली पराकाष्ठा, अपारदर्शकता आणि समाजातील भावना दुर्लक्षित केल्या जाणे हे सर्वथा निंदनीय आहे. ट्रस्टच्या डीडमध्ये तरतुदी असताना जर समाजाच्या हिताला धक्का पोहचवणारे निर्णय होत असतील, व प्रशासनात निष्पक्षता वा पारदर्शकता नसल्याचे दिसत असेल, तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. समाजाचा घटक म्हणून, ट्रस्टची संपत्ती विक्री, मंदिराच्या अस्तित्वाबाबत अनिश्चितता आणि नवनिर्माणाच्या योजनांत खुली चर्चा न करणे याचा आम्ही तीव्र निषेध करतो. योग्य चौकशी व्हावी, पारदर्शक समिती नेमावी आणि समाजाशी समन्वय साधून पुढील निर्णय घ्यावेत, ही आमची आग्रही मागणी आहे.



