सेलू ( प्रतिनिधी ) : सेलू येथील साईबाबा नागरी सहकारी बँकला भारतरत्न सहकारिता सन्मान -२०२४ अंतर्गत ‘बेस्ट डायरेक्टर ऑफ द ईअर’ आणि ‘बेस्ट डिजीटल पेमेंट इनिशेटिव्ह’, असे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार . भारत को ऑपरेटिव्ह बँक मुंबई या संस्थेच्या वतीने साईबाबा बँकेची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली होती दिनाक २२ मे रोजी 24 रोजी मुंबई येथील हाॅटेल ललित येथे आयोजित समारंभातश्री सोमेश जोशी(डि डि जि,जॉईंट सेक्रेटरी लेव्हल मिनिस्ट्री ऑफ कमन्यूकेशन गोव्हर्मेंट ऑफ इंडिया )यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले आहेत, हा पुरस्कार अध्यक्ष हेमंतराव आडळकर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने यांनी स्वीकारला आणि साईबाबा बँक संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.