आपला जिल्हा
जाधव संजय (बंडू) हरिभाऊ यांनी भरला उमेदवारी अर्ज तर रासपचे महादेव जानकर यांचा आज पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल
आज परभणी लोकसभा मतदार संघासाठी 5 उमेदवारांचे 7 अर्ज दाखल

परभणी, दि.2 ( प्रतिनिधी ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी आज 5 उमेदवारांनी 7 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकुण 9 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले आहे. तर आज 24 उमेदवारांना 27 नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 85 इच्छुक उमेदवारांना 114 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघूनाथ गावडे यांनी दिली आहे.




