आपला जिल्हा

भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त वालूरात अखंड हरिनाम सप्ताह…

सेलू ,दि.१९ ( प्रतिनिधी ) राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार (ता.२०) अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताह दरम्यान श्रीमद् भागवत कथा,ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे.
पुरूषोत्तम महाराज चौथरी वालूरकर यांच्याहस्ते सप्ताहास प्रारंभ होणार.
नारायण बुवा पाठक हे भागवत कथा सांगणार आहेत.शनिवारी (ता.२०) पासून सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात प्रवचनकार व कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. शनिवारी (ता.२०) महेश महाराज देशमुख ,रविवारी (ता.२१) प्रकाश महाराज फड,सोमवारी (ता.२२) विजय महाराज वाघ बनकर,मंगळवारी (ता.२३)शिवतेजानंद महाराज दराडे,बुधवारी (ता.२४)राधेश्याम महाराज खरबळ, गुरुवारी (ता.२५)विठ्ठल महाराज उमरीकर, शुक्रवारी (ता.२६),जालिंदर महाराज दराडे यांचे
कीर्तन रात्री ९ ते ११ या वेळेत होणार आहे. त्याच बरोबर पहाटे ४ते ६ काकडा भजन, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी १२ ते ३ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा,सायंकाळी ६ते ७ हरिपाठ,रात्री ११ते ४ सकाळी ४ हरीजागर.
शनिवारी (ता.२७) सकाळी ११ते १ प्रकाश महाराज साठे यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचक्रोशीतील भाविकांनी भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!