आपला जिल्हा

“समस्यांकडे संधी म्हणून पहा.” उपविभागीय अधिकारी मेघना कावली

सेलू (प्रतिनिधी)
“विद्यार्थिनीनी समस्याकडे संधी म्हणून पहा.समस्या सोडवा, समस्यांची दोन हात करा, जगात अशक्य असे काहीच नाही. सातत्याने शिक्षण घेत राहा. स्वतःची प्रगती करत राहा. कारण शिक्षणात तुमचे आयुष्य बदलण्याची अलौकिक ताकद आहे” असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी मेघना कावली यांनी केले.
श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व आणि तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग सेलू. वार्षिक स्नेहसंमेलन 2023 -24 अंतर्गत सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी मेघना कावली( उपविभागीय अधिकारी सेलू) या बोलत होत्या.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य व्ही .के.कोठेकर ,प्रमुख अतिथी मेघना कावली उपविभागीय अधिकारी सेलू, प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल , उपमुख्याध्यापक दतराव घोगरे सर, सांस्कृतिक विभागप्रमुख भालचंद्र गांजापुरकर , क्रीडा विभाग प्रमुख संगीता खराबे , नृत्यदिग्दर्शक सतीश धोत्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि रंगदेवता नटराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
स्वागत गीत संस्कृती सावजी नी सादर केले.
याप्रसंगी सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मेघना कावली यांच्या हस्ते करण्यात आले.
मेघना कावली यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन अध्यक्ष प्राचार्य व्ही.के.कोठेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अध्यक्षिय समारोप करताना प्राचार्य व्हि. के. कोठेकर सर यांनी विद्यार्थिनीना सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा साठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला ओवी ,नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन भालचंद्र गांजापुरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, नागेश देशमुख, सुनील मोगल, रेणुका आंबेकर ,सुषमा दामा, सीमा सुकते, वैशाली चव्हाण, सतीश कुंडीकर, सुहास देऊळगावकर, कैलास मलवडे ,विनोद शिंदे बाबासाहेब थोरे, किशोर ढोके यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!