आपला जिल्हा

योग आहार साधना या त्रीसूत्रीतुनच निरामय जीवन जगता येते. – मुख्य केंद्रीय प्रभारी परमार्थ देवजी

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुका योग परिवार आयोजित योग, आयुर्वेद, भारतीय संस्कृती यावर हरिद्वारचे परमपूज्य स्वामी परमार्थ देवजी, मुख्य केंद्रीय प्रभारी यांचे दिनांक 29 मार्च रोजी साई नाट्यमंदिर सेलू येथे व्याख्यान झाले.

आपल्या व्याख्यानात त्यांनी योग, आयुर्वेद, भारतीय संस्कृती यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानी डॉ. विनायकराव कोठेकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बापूजी पाडळकर राज्य प्रभारी, विनोदराव बोराडे, लक्ष्मीकांत पाथरीकर महाराज, उदय वाणी राज्य किसान प्रभारी, अविनाश आचार्य राज्य मीडिया प्रभारी, धोंडीराम सेप, नीता बलदवा सहराज्य महिला प्रभारी, पुनम खत्री जिल्हा महिला प्रभारी, बालासाहेब गजमल, चंद्र प्रकाश सांगतानी, उर्मिला बोराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्ह्यातील पतंजली योग परिवाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचे मुख्य केंद्रीय प्रभारी परमार्थ देवजी, हरिद्वार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यामध्ये सेंद्रिय शेती तज्ञ पुरस्कार प्राप्त सोमेश्वर गिराम आणि राधिका गिराम यांचा तसेच सेंद्रिय संत्रा उत्पादक रूढी, तालुका मानवत चे विष्णू निर्वळ यांचा शेतकरी गटाचे खानापूर येथील पंडित थोरात , ब्रह्म वाकडी तालुका सेलू येथील गोशाळेचे मुख्य व्यवस्थापक राधाकिशन कदम तर कृषी पत्रकारिता पुरस्कार प्राप्त रामराव सोनवणे या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
नूतन योग सेंटरच्या संस्कृती डहाळे आणि श्रुती खंदारे या राष्ट्रीय योगपटूंनी उत्कृष्ट योगासन प्रात्यक्षिक सादर केले.
प्रास्ताविक नागेश देशपांडे यांनी आभार कैलास रकटे यांनी तर सूत्रसंचालन देविदास सोन्नेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय माकोडे, डॉ. श्रीराम गजमल, अशोक वैद्य, विनोद मोगल, ज्ञानोबा बरसाले, परमेश्वर राऊत, विजयकुमार राऊत, मधुरा खारकर, विना मालानी, रोहित खत्री यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!