आपला जिल्हा

गरीबांची मदत करतांना जात पाहू नका शाही ईमाम उस्मान लुधीयानवी यांचे आव्हान

सेलू ( प्रतिनिधी ) पंजाब राज्यातील शाही ईमाम मौलाना हझरत मोहम्मद उस्मान साहब लुधीयानवी यांच्या धार्मिक व्याख्यानाचे आयोजन सेलू शहरातील रेल्वस्थानक जवळील असलेल्या मदिना मस्जिद येथे आज दिनाक 8 ऑक्टोबर रविवार रोजी आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी सेलू शहरातील रहेमान नगर भागात नवीन मस्जिद बांधकामाचे उद्घाटन पंजाब राज्याचे शाही ईमाम मोहम्मद उस्मान लुधियानवी यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन नंतर शाही ईमाम उस्मान लुधीयानवी यांनी जगातील सर्व धर्मीयांच्या सुख शांतीसाठी दुआ मागितली.

या धार्मिक व्याख्याण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्राणी होते पंजाब राज्याचे शाही इमाम मोहम्मद उस्मान लुधीयानवी यांच्या कुटुंबाचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात फार मोठे योगदान असून स्वतंत्र लढाईत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक वर्ष तुरुंगवास झालेला आहे. त्यांच्या कुटुंबाचे कार्य पाहून भारत सरकार तर्फे त्यांना शेर ए पंजाब ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे.
मौलाना उस्मान लुधीयानवी यांनी धार्मिक व्याख्याणात मार्गदर्शन करताना मुस्लिम समाज बांधवांना आव्हान केले की जगातील सर्वात मोठा धर्म मानवतेचा धर्म आहे गोर गरीब गरजूंना मदत करतांना जात पाहू नका श्रेष्ठी वर सर्वजण श्रेष्ठ आहेत मुस्लिम समाजात जे मनुष्य निराधारांना आधार देत नाही दान धर्म करत नाही मदत करत नाही
अश्या माणसाने आयुष्यभर केलेल्या अल्लाहची इबादत त्याच्या तोंडावर फेकली जाणार आपसातले मदभेद सारून एक मनाने एकजुटीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करीत जीवन जगत अल्लाह पाकची ईबादत, पाच वेळा नमाझ पठण करने,इस्लाम धर्म गुरू पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीची अमालबजावणी, करने उलेमा ए दिन यांचे आदर, करने दाढी ठेवणे सह अनेक धार्मिक कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, याहिया खान, सय्यद ईमरान, सह सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!