आपला जिल्हा

“किशोरवयीन मुलींना समुपदेशन” प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचा उपक्रम

सेलू. ( प्रतिनिधी ) दि. 24 आज शनिवार रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे मुलींच्या रक्षणाकरता “किशोरवयीन मुलींना समुपदेशन ” “चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श ”  हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे पोलीस कर्मचारी ए.पी. आय. प्रभाकर कव्हळे, ज्ञानेश्वर जानकर, शिवदास सूर्यवंशी,अस्मिता सूर्यवंशी, प्राचार्य श्री. कार्तिक रत्नाला, प्राचार्या सौ. प्रगती शिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना कायदा, तक्रार पेटी यांची माहिती दिली. मुलींच्या सुरक्षतेसाठी दामिनी पथक, निर्भय पथक तसेच काही अडचण आल्यावर ११२ पोलीस दीदी म्हणून संरक्षण पथक आहे. याची माहिती दिली. मुलिंना वैयक्तिक सीमा, संमती आणि सुरक्षितता समजून घेण्यास मदत करण्यासाठी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या संकल्पना कळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चांगले स्पर्श अनेकदा सार्वजनिक, दृश्यमान आणि तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबत घडतात. जो स्पर्श सौम्य,दयाळू आणि आदरयुक्त असतो. वाईट स्पर्श अनोळखी व्यक्तींकडून किंवा तुमचा विश्वास नसलेल्या लोकांकडून घडतो. जो स्पर्श तुम्हाला अस्वस्थता,भीती, आक्रमक वाटतो. यावर उपाय म्हणून संरक्षणासाठी मुलींनी कराटे शिकले पाहिजे. संवाद कौशल्ये विकसित कले पाहिजे. खुले व वयानुसार संभाषण केले पाहिजे. वेळोवेळी प्रश्न विचारून चिंतामुक्त व्हायला पाहिजे. थोडक्यात निखळ संवाद आपल्या पाल्यासोबत मैत्रीपूर्ण नात्याने केलं पाहिजे. भीती न वाटता मुलींनी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारे मुलींना पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कल्पना भाबट केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!