आपला जिल्हा

शिवसेनेकडून संजय जाधव यांच्या रूपाने परभणीत तगडे आव्हान तर महायु्तीकडून जानकर आपले नशीब अजमावणार

परभणी ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे.

तर महायुती कडून महादेव जानकर 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.या मुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संजय जाधव तिसऱ्यांदा मोठे आव्हान उभे करणार आहेत तर त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून महायुती कडून महादेव जानकर आपले नाशिब अजमाविणार असल्याचे दिसत आहे.
जानकर येणाऱ्या दोन एप्रिल रोजी महायुती कडून ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थककाकडून मिळाली आहे.
परभणी जिल्हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे आणि या ठिकाणी गेल्या तीन टर्म पासून शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वेळेस महायुती कडून जानकर यांना किती ताकद मिळते आणि जिल्ह्यातील मतदार कोणाला आपली पसंती देतील या वरून उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान जाधव समर्थकांनी उमेदवारी जाहीर झाल्यापाठोपाठ जाधव यांच्यावर अभिनंदनचा मोठा वर्षाव केला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!