आपला जिल्हा

थकबाकी न भरल्याने….. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दालनास न. प. कडून ठोकलं सील

⬛ सेलूतील इतर थकबाकीदारानी थकबाकी ३१ मार्च आगोदर भरणा करण्याचे आवाहन

सेलू ( प्रतिनिधी ) 94 लक्ष ची थकबाकी पोटी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दालनास नगर परिषद सेलू कार्यालयाने आज मंगळवारी दुपारी 4.50 वा सिल ठोकले. नोव्हेंबर पासून वारंवार पाठपुरावा करण्यात येऊन सुद्धा  कुठलाही प्रतिसाद न दिल्याने  नाईलाजास्तव सिल ठोकण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती कार्यवाही वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

तहसील कार्यालय, पाठबांधारे विभाग, महावितरण इत्यादी वरिष्ठ कार्यालयाची देणे बाबत नगर परिषदेला सर्वच वरिष्ठ कार्यालय मार्फत पाठपुरावा सुरू असून स्व उत्पन्न वाढविण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त आहेत. १५ वा वित्त आयोग, सहायक अनुदान इत्यादी शासनाकडून प्राप्त होणारी विविध अनुदाने देखील नगर पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे अवलोकन करून च उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगर पालिकेला दिल्या जात असल्याने नगर परिषदेला आर्थिक उत्पन्न वाढविल्या खेरीज दुसरे उपाय नसल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री देविदास जाधव ह्यांच्याकडून कळाले. तसेच सेलू शहरातील इतर थकबाकीदार ह्यांनी नगर परिषदेला आपल्याकडील थकबाकी ३१ मार्च आगोदर भरणा करून नगर पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक मार्फत करण्यात आली आहे.

या वेळी श्री भगवान चव्हाण उप मुख्याधिकारी, ऊ. बा चाऊस प्रशासकीय अधिकारी, नितीन इजाते कर अधीक्षक, मुस्तजाब खान कर निरीक्षक, स्वामी कार्यालयीन अधीक्षक आणि इतर कर व प्रशासन विभागातील कर्मचारी उपस्थित होते..

Related Articles

Back to top button
Don`t copy text!