आपला जिल्हा
विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे – प्रभाकर कवाळे
⬛ कै. श्रीरामजी भांगडिया चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण

सेलू ( प्रतिनिधी ) शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर्श घेऊन शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे त्याच बरोबर कला, संगीत क्षेत्रात करियरसाठी खूप संधी उपलब्ध आहेत त्या मुळे बालवयात विद्यार्थ्यांनी या विविध स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे असे प्रतिपादन सेलू पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी केले.शनिवार दि.23 मार्च 2023 रोजी नूतन विद्यालय प्रार्थना मैदानावर आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.




