आपला जिल्हा

सेलूत गोपाष्टमी निमित्य गोमाता पुजन – गोदिंडी

सेलू ( प्रतिनिधी ) येथील श्रीसंत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या वतीने आज रविवार दिनांक १० नोव्हेंबर कार्तिक शुक्लपक्ष गोपाष्टमी च्या निमित्ताने गोमाता पुजन व गोदिंडी उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रतिवर्षा प्रमाणे दादुपंथी मठ गोशाळेच्या वतीने याही वर्षी भगवान गोपाल श्रीकृष्णांच्या गोसेवा प्रारंभ दिनाच्या निमित्ताने “गोपाष्टमी उत्सव” मोठ्या उतसाहात साजरा केला जातो . प्रारंभी गोशाळेत गोमातेचे शास्त्रोक्त व विधीवत पद्धतीने पवीत्र मंत्रोच्चारात पुजन करण्यात आले. त्यानंतर गोमातेला साज शृंगारीत करून श्रीसंत गोविंद बाबा दादूपंथी मठ ते सदगुरू श्रीसंत केशवराज बाबासाहेब मंदिर ते परत गोविंदबाबा मठ गोशाळा अशी गोदिंडी आयोजित करून गोमातेची वाद्यवृंदासह वाजत-गाजत नगर परिक्रमा करण्यात आली.
या उपक्रमात सेलूतील सर्व गोसेवक, गोशाळेचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठीत व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोशाळेच्या सर्व पदाधिकारी व गोसेवकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!