आपला जिल्हा

स्वर्गीय श्री गणेशलालजी सारडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मानवतरोड रेल्वे स्टेशनवर पानपोई

मानवत/प्रतिनिधी मानवत येथील उद्योगपती श्रीकिसनजी सारडा यांचे वडील स्वर्गीय गणेशलालजी सारडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानवत रोड रेल्वे स्टेशन मध्ये प्रवाशांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध होणे साठी पाणपोळीचे शुभारंभ परभणी वाणिज्य विभागाचे सीसीआय अजय कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तर रेल्वे स्टेशन ड्युटीवर असलेले स्टेशन मास्टर अजय कुमार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आले.
सीसीआय अजय कांबळे यांच्या हस्ते पाण्यासाठी लावलेल्या रांजणाची पूजा करून पाणी वाटप करण्यात आले. यावेळी सारडा कुटुंबीयांच्या वतीने रामनिवास सारडा यांच्या हस्ते प्रवाशांना पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी पानपोई सुरू करण्यासाठी साठी सहकार्य करणारे भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रवासी प्रकोष्ट परभणी जिल्हा कार्यकारणीचे सहसंयोजक के.डी.वर्मा,भाजप रेल्वे प्रवासी मानवतरोड रेल्वे स्टेशन प्रकोष्ठ चे सदस्य नाथभजन….. व
प्रफुलकुमार जैन, मानवत रोड रेल्वे स्टेशनचे प्रमुख स्टेशन मास्टर केदार मंडलवार, रानबा अहिरे. नितीन घनधाव, मानवतरोड रेल्वे स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रामनिवास सारडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. आमची आई आणि आजोबा यांच्या स्मरणार्थ स्टेशनच्या दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना शुद्ध शितलपाण्याची सुविधा उपलब्ध होणे हेतू वॉटर कुलरची व्यवस्था आम्ही करणार असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!