आपला जिल्हा

मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थिती वर चर्चा सत्र संपन्न

सेलू ( प्रतिनिधी ) मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थिती व समाजाची जबाबदारी या विषयावर येथील माशा अल्लाह फंक्शन हाॅल येथे माजी नगरसेवक शेख रहीम यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा सत्र घेण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन शेख माजीद व त्यांच्या युवा सहकारी तर्फे करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मुस्लिम युथ फोरम संभाजीनगरचे अध्यक्ष मिर्झा दाऊद आझाद यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणुन ॲडव्होकेट शेख असीम , सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद यांनी विद्यार्थि व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना खाजा, ॲडव्होकेट विष्णु ढोले, सय्यद अनस, शेख उमेर, शेख अमजद, शेख साजीद अदि उपस्थित होते.
खान अब्दुल गफार खान शाळेचे मुख्याध्यापक तौखिर, नूर सह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन तौखिर सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!