आपला जिल्हा

गरजू व्यक्ती अनुदानापासून वंचित राहू नये शिबिराचा मुख्य उद्धेश :- डॉ. संजय रोडगे.

संजय गांधी निराधार योजना विशेष शिबिर

सेलू  ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील गरजू नागरीकाकरिता संजय गांधी निराधार योजना भव्य शिबिराचे (ता.8) वार शुक्रवार रोजी जि.प.प्रा.शा.नूतन रोड येथे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, समितीचे सदस्य सचिव तथा सेलू तहसीदार मा. दिलीप झांपले, कृ.उ.बा.समितीचे संचालक तथा बीजेपी तालुकाध्यक्ष अँड. दत्तराव कदम, बीजेपी शहराध्यक्ष अशोक अंभोरे, बीजेपी महिला तालुकाध्यक्ष मा. वनिताताई चाफेकर, कृ.उ.बा. समितीचे संचालक केशव सोळंके , मा.विष्णू बुधवंत , मा.दत्तराव जाधव, मा.तुकाराम घनवटे, मा. भारत इंद्रोके, मा.ज्योती मोगल, मा. दीपक चव्हाण, दिव्यंग हक्क मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर, सर्व सरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, सेलू-जिंतूर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सौ.मेघनादीदी बोर्डीकर- साकोरे व माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेअंतर्गत सर्व निकष, अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या 300 हून अधिक गरजू लाभार्थ्यांचे अर्ज पात्र करण्यात आले असून. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनाला सोबत घेऊन सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. समाजातील निराधार व गरजू जनतेची सेवा करण्याची संधी यानिमित्त मिळाली आहे. मागिल 20 वर्षापासून वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेली जबाबदारी ही अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा मानस आहे. तसेच या योजनांची सर्व प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांसमोर मांडली आहे. यापुढेही समाजाची सेवा करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील. सेलू तालुक्या तील निराधार, वंचित, विधवा व गरजू व्यक्ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता ग्रामपातळीवर तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी, यांनी घ्यावी व सर्व गरजू पात्र असलेल्या व्यक्तींचे अर्ज सेतू सुविधा केंद्र मार्फत ऑनलाईन व आपल्या गावातील तलाठ्याकडे दाखल करावेत. तसेच याप्रसंगी संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी वृधोपकाळ योजना आदी योजनेची माहिती शिबिर स्थळी लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे माहिती दिली.

याप्रसंगी मा. दिनेशजी झांपले, अँड. दत्तराव कदम आदींनी योजेनेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता तांबे यांनी केले तर आभार तुकाराम घनवटे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!