आपला जिल्हा

क्रांतीसुर्य महात्मा फुले व विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध

⬛ धनेगाव ग्रामपंचायत तर्फे जागा निश्चित फालकाचे अनावरण

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील धनेगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नियोजित पुतळ्यासाठी ग्रामपंचायत धनेगावच्या वतीने जागा उपलब्ध करून देण्यात आली व नियोजित जागेवरती नाम फलकाचे अनावरण करण्यातआले.

क्रांतीसुर्य महात्मा फुले व विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची जाणीव येणाऱ्या पिढ्याना कळावी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांचे कार्य जनमांनसाना प्रेरणा देईल या उद्देशाने या स्मारकचे काम हाती घेण्यात आल्याची प्रतिक्रिया श्याम कटारे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी सखाराम कटारे माळी महासंघ सेलू तालुका अध्यक्ष शाम भाऊ कटारे उप सरपंच पवन भाऊ कटारे माजी सरपंच सुदाम भाऊ कटारे वाल्मीक कटारे संतोष कटारे आसाराम थोरे अमोल कटारे रामप्रसाद भाऊ कटारे छगन बापू कटारे गणेश भाऊ कटारे महादेव थोरे व समस्त गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!