आपला जिल्हा

श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा बाळगू नये…! – केंद्रप्रमुख श्री एकनाथ जाधव

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

सेलू ( प्रतिनिधी ) दि.28 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून केंद्रप्रमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस वेडे गृहप्रमुख प्रेरणा पवार, विज्ञान शिक्षिका श्रीमती आश्विनी बोराडे व केंद्रप्रमुख एकनाथ जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना केंद्रप्रमुख म्हणाले की लहानपणापासून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. एखाद्या गोष्टीकडे सूक्ष्म निरीक्षणांनी पाहिले पाहिजे. तुम्हाला पुढे जायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक महान व्यक्तींनी आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रमाणिक प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे जो प्रामाणिक प्रयत्न करतो तो नक्की यशस्वी होतो. तसेच त्यांनी सी व्ही रामन यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक विज्ञान शिक्षिका अश्विनी बोराडे यांनी केले. मुख्याध्यापिका सुनीता वेडे यांनी हे मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनींनी विविध वैज्ञानिक रांगोळी रेखाटल्या होत्या.शाळेच्या आवारात विविध प्रयोगांचे सादरीकरण बालिकांनी केले. विद्यार्थिनींना श्रीमती अश्विनी बोराडे व श्रीमती आम्रपाली कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन श्री पांडुरंग पाटणकर यांनी केले तर आभार श्रीमती सुनीता वेडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुहास नवले ,सहशिक्षिका श्रीमती वनदेवी वाघमारे ,श्रीमती योजना कातकडे, श्रीमती अनुसया शिंदे ,श्रीमती शीतल अवचार ,श्री रावसाहेब पदमपल्ले आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!