सेलू ( प्रतिनिधी ) आज सेलू शहरातील स्व श्री संत गोविंद बाबा दादू पंथी मठ गौशाळा येथे राज्यमंत्री व महाराष्ट्र गोसेवा आयोगचे अध्यक्ष मा.ना श्री शेखरजी मुंदडा यांनी गोशाळेत भेट दिली. शासनाच्या वतीने गोशाळेस 20 लक्ष रुपये मंजूर करून दिले. गोशाळेच्या बऱ्याच अडचणी मा.मुंदडाजी यांना सांगण्यात आल्या त्यावर तोडगा काढण्याचा आश्वासन त्यांनी दिले.
भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने मा.ना.श्री.शेखरजी मुंदडा यांचे स्वागत केले. कार्यक्रमास मा.श्री शेखरजी मुंदडा कोहिनूर उद्योग समूहाचे नंदकिशोर बाहेती, विजयकुमार बिहाणी , सुरेंद्र(भाऊ)तोष्णीवाल, संदीपभाई शर्मा महाराज, वल्लभ बाहेती, जगनराव पवार, ॲड संजय लोया,ॲड खोना, शिवनारायण मालाणी, राजेंद्र करवा, श्रीराम जन्मोत्सव समितीचे कृष्णा काटे, स्व श्री संत गोविंदबाबा दादुपंथी मठ, गोशाळेचे सर्व सन्माननीय सदस्य यावेळी उपस्थित होते.