आपला जिल्हा

सेलू शहरात सार्वजनिक शिवजन्मोत्सव मिरवणूक मोठ्या उत्साहात व शिस्तीत संपन्न…!

सेलू ( प्रतिनिधी ) सदरील शिवजन्मोत्सवाची मिरवणुक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ( शिवतीर्थ ) सेलू येथून प्रारंभ झाली, या भव्य मिरवणूकीतील प्रमूख आकर्षण म्हणून जे ठरले ते म्हणजे कोल्हापूर येथील वस्ताद शांतीदूत मर्दानी आखाड्याचे अतूल शिंदे व सहकारी यांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके, बारामती येथील प्रसिद्ध हल्गी पथक, मराठवाड्यातील सूप्रसिद्ध संबळ पथक तसेच महाकालेश्वर महादेवाची मूर्ती व जिवंत देखावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची भव्य मूर्ती, भारतमातेचे प्रतिरूप म्हणून वेगवेगळ्या कालखंडात समाजकल्याणासाठी काम केलेल्या आई अहिल्यादेवी होळकर, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, सेलू शहरातील हिंदू माताभगिनींचे ध्वज व लेझीम पथक, बालमावळे, मावळ्यांची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखातील बालशिवबा, सेलू शहरातील प्रसिद्ध बॅन्ड पथक व शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांची सूंदर अशी मूर्ती मिरवणुकीच्या अग्रभागी परमपवित्र हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज होता.

सदरील मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने महिला भगिनीं उपस्थित होत्या सेलू शहरातील शिवजन्मोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड संख्येने महिला उपस्थित होत्या.
मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनचरित्रावरील जिवंत देखावा शिवप्रताप व हिंदवी स्वराज्याची शपथ हा दाखवण्यात आला त्यानंतर लगेचच सामूहिक महाआरतीने मिरवणुकीचा समारोप करण्यात आला व सेलू शहरात पहिल्यांदाच भव्य अशी आतिषबाजीने समारोप झाला.
आजपर्यंतच्या इतिहासातील ही पहिलीच अशी मिरवणूक होती जिला कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाशिवाय सर्वसामान्य शिवभक्तांची सेलूकरांच्या हक्काची शिवजयंती म्हणून सर्वसामान्य नागरिकांनी सामूहिक जबाबदार्या घेऊन पार पाडली या मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सेलू विभागाच्या सर्व शिवशंभूभक्तांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले व ही मिरवणूक यशस्वी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!