आपला जिल्हा

सेलूत स्लो-मोटारसायकल स्पर्धेला प्रतिसाद ; शिवजयंती निमित्त भाजप चा उपक्रम

यशमिळवण्या साठी स्लो-गतीला महत्त्व-डॉ.संजय रोडगे

सेलू (प्रतिनिधी )जीवनात वेगवान गतीमुळे अनेक वेळा कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो परंतु यश मिळवण्यासाठी अनेक वेळा स्लो -गती फलदायी ठरते म्हणून स्लो गतीचे महत्त्व आहे त्यामुळे युवकांनी त्याचे अनुकरण करावे असे आवाहन डॉ संजय रोडगे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भाजप चे जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरूळ व मित्र मंडळाच्या वतीने मंगळावर दि.२० फेब्रुवारी रोजी आयोजित स्लो मोटार सायकल स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी भाजप चे तालुकाध्यक्ष ऐड.दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, संजय लोया, प्रसाद खारकर,विठ्ठल कोक्कर,शिवहारी शेवाळे, भागवत दळवे,गणेश काटकर,कपील फुलारी, गायके सरपंच,बाळासाहेब काजळे, ईश्वर तावरे,आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेत शहरातील ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुकुंद डासाळकर- प्रथम, शुभम काळबांडे-द्वितीय, कृष्णा काळे यांने तृतीय क्रमांक पटकावला तर नागेश सरकटे याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अनुक्रमे प्रथम रू. ७७७७/-, द्वितीय रू.५५५५/- तर तृतीय रू. ३३३३/- रोख पारितोषिके व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर संयोजक अर्जुन बोरूळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुनील राठोड,शुभाष खंदारे,अभय महाजन संदीप बोकन, राजू रगशिगे गोविंद खराबे, गोविंद हरने, कृष्ण बोरुळ , कृष्ण चव्हान, पंकज वयाळ गोपाळ लहाने,प्रकाश शेरे, दत्ता पवार,आदींनी परीश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!