आपला जिल्हा

मराठा समाजाला पक्के आरक्षण आणि सगेसोयरे कायद्यास होणारा विलंब म्हणून ; सेलूत युवकाची आत्महत्या

प्रताप शेवाळे हा एकूलता एक असल्याने या घटनेमुळे परीसरात हळहळ

सेलू (प्रतिनिधी ) : सेलू तालुक्यातील राजवाडी गावात शनिवारी सकाळी साडेनऊला एका तरुणाने शेतात पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करणाऱ्या युवकांचे नाव प्रताप शेवाळे असे असून तो २७ वर्षाचा होता.
घटनास्थळावरील पुराव्याने ही आत्महत्या मराठा आरक्षणामुळे झाल्याचे पुढे येत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हाळ, पो. नि. प्रभाकर कवाळे, पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी यांनी घटनास्थळी केलेल्या पंचनामा केला. मयत प्रताप शेवाळे यांच्या खिशात सापलेल्या चिठ्ठीत सापडली. यात माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळण्यासाठी सगेसोयरे कायदा पारीत होणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या कारणामुळे मी आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. शेवविच्छेदनासाठी मृतदेह सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुल असा परिवार आहे. प्रताप शेवाळे हा एकूलता एक असल्याने या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!