आपला जिल्हा

रक्तदान शिबीरे ही काळाची गरज – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

सेलूत रक्तदान शिबिरात 300 जणांचे रक्तदान

सेलू ,(प्रतिनिधी) : रक्तदान शिबीरे ही काळाची गरज असून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच ती एक चळवळ झाली पाहिजे, त्यासाठी आपण सेलूत केमिस्ट भवनाच्या उभारणीसाठी सहकार्य करु, असे आश्‍वासन राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

अखिल भारतीय व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथआप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसा निमित्त परभणी जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अंतर्गत सेलू तालूका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने येथील साईनाट्य गृह परिसरात शुक्रवार 24 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी सौ. साकोरे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती दिनकर वाघ, डॉ. ऋतुराज साडेगावकर, डॉ. संजय रोडगे, अ‍ॅड. दत्तराव कदम, अशोक अंभोरे, शिवाजीराव खेडकर, सुंदरराव गाडेकर, नामदेव पांचाळ, अजय डासाळकर, संदीप टाक, केदार गजमल यांची उपस्थिती होती.

या रक्तदान शिबीरात 300 रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचा उच्चांक नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष संदीप टाक सुत्रसंचालन सुभाष मोहकरे तर कैलास काळे यांनी आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी परभणी मेडीकल कॉलेजचे डॉ. राकेश शिंगदणे, दत्ता रासवे, रामा रेंगे, मंजेस खिल्लारे, तेजस पतंगे, आकाश भालेराव, विकास रहाटकर, मकरंद कुलकर्णी, जयश्री कांबळे, प्रतिक्षा कदम यांच्यासह सुनीलबापु डख, माणिकराव डख, शिवनारायण मालाणी, प्रेमराज चव्हाण, मुकेश खेडेकर, समिर नाईकवाडे, प्रविण लोया, सतीश मुरकुटे, शौकत बागवान, शेख आमजद, गणेश साडेगावकर, लक्ष्मण पौळ, चंद्रकांत गटकळ, दिपक मंत्री, स्वप्नील जाधव, सोळके, गबाळे, गात यांच्यासह मेडीकल असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!