आपला जिल्हा
महासंस्कृती महोत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी घेतला आढावा

परभणी, दि. 1 (प्रतिनिधी ) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमितत राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातनू वसमत रोड, परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.




