आपला जिल्हा

गोशाळेच्या वतीने पर्यावरण पुरक श्रीं च्या मुर्तींचे मोफत वाटप

सेलू (बातमीदार ) येथील श्री संत गोविंद बाबा दादुपंथी मठ गोशाळेच्या वतीने शहरातील काही नागरीकांना श्रीं च्या पर्यावरण पूरक मुर्तींचे मोफत वितरण करण्यात आले.

या मुर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती, शेण व वॉटर कलर चा वापर करण्यात आला. श्रींची मुर्ती तयार करण्यासाठी अहमदनगर येथून साचा आणून मुर्ती तयार करण्याचे काम पुर्ण करण्यात आले. या साठी स्थानीय मृदुकलावंत भगीरथ नोकवाल, सय्यद शाकेर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या मुर्ती तयार करण्यासाठी सुरेंद्र तोष्णीवाल, शिवनारायण मालाणी, राजेंद्र करवा, सुर्यकांत जाधव, गोविंद शेलार, गणेश भागडे, प्रतीक आदींनी परिश्रम घेतले. या श्रीं च्या पर्यावरण पूरक मुर्ती सर्व गणेश मंडळांनी मांडव्यात व पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच अनंत चतुर्दशीला श्रींच्या मुर्ती चे टबमध्ये विसर्जन करून हे पाणी परसबागेतील झाडांना अथवा शेतात टाकावे असे आवाहन गोशाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!