आपला जिल्हा

सेलू रेल्वे स्थानकावर फिरोजपूर एक्सप्रेस चे स्वागत

सेलू (प्रतिनिधी) उत्तर रेल्वेने नव्याने सुरू केलेल्या नांदेड- फिरोजपूर साप्ताहीक सुपरफास्ट रेल्वेच सेलू रेल्वे स्थानकावर मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाच्या वातीने जोरदार स्वागत करण्यात आले.


यावेळी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी , शिवसेनेचे माजी न प सदस्य मनिषभाऊ कदम , रेल्वे बोर्ड सदस्य शिवाजी शिंदे, कृष्णा काटे , भगवान पावडे, बबलू मंडलीक , शेख मुनीर, मोहन खापरखुंटीकर, विकी कुंदनानी, आनंद बाहेती, दिलीप जसाळकर, सच्चिदानंद डाखोरे, भरत रोडगे, प्रभाकर पावडे, सुभाष मोहकरे यांनी रेल्वे चालक संजय दास, स्टेशन मास्टर अरविंदकुमार आर्या, तिकीट तपासणीस गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन व पेढे भरवून स्वागत करण्यात आले.
फिरोजपूर- हुजूरसाहेब नांदेड ही रेलवे दर शनिवारी रात्री ११-०० वाजता व नांदेड – फिरोजपूर ही रेल्वे दर रविवारी दुपारी 1-40 वा सेलू स्थानकावर थांबणार आहेत. या नवीन साप्ताहीक सुपरफास्ट एक्स्प्रेस मुळे मराठवाड्यातील पर्यटक व यात्रेकरूंना थेट हरिद्वार, अयोध्या, उज्जैन महाकालेश्वर, वैष्णव देवी, दिल्ली, इत्यादी तिर्यक्षेत्रांना जाण्यासाठी व्यवस्था झाली आहे त्यामुळे प्रवासी व नागरिका मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!