क्रीडा स्पर्धेत परभणी ग्रामीण, जालना,बीड संघाचे वर्चस्व.
शालेय विभागीय टेनिस व्हॉलीबॉल, रस्सीखेच, फ्लोअरबॉल स्पर्धा

भारतीय खेळांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहु : मा.आ. हरीभाऊ लहाने.
सेलू ( प्रतिनिधी ) क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या मान्यतेने.
परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल व फ्लोअरबॉल, रस्सीखेच असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू. वतीने. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत
शालेय विभागीय टेनिस व्हॉलीबॉल/फलोअरबॉल , रस्सीखेच क्रीडा स्पर्धा, दिः 3 फेब्रु 2024.रोजी : नूतन विद्यालय सेलू.येथे मा.आ. हरीभाऊ काका लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी डॉ. व्हि.के. कोठेकर (संस्था सचिव) हे होते.तर प्रमुख उपस्थिती मिलिंद सावंत (जिल्हा सचिव कॉग्रेस पार्टी)शहर प्रमुख पांडुरंग कावळे, अविनाश शेरे,प्र. मुख्याध्यापक संतोष पाटील , पर्यवेक्षक के.के. देशपांडे, डी.डी. सोन्नेकर, प्रमोद खरात, रामेश्वर कोरडे, के.जे.शेख, सतीश नावाडे, आदी उपस्थित होते.
उद्घाटन पर बोलताना हरीभाऊ लहाने म्हणाले की भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळांच्या स्थापनेपासून आम्ही खेळांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत. आज या खेळांच्या शालेय स्तरावर समावेश झाला आहे. यास शासकीय सुविधा निर्माण देण्यासाठी मुख्यमंत्री व क्रीडा मंत्री यांच्या मदतीने मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळवे, तर आभारप्रदर्शन प्रशांत नाईक यांनी मानले.
विभागीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत 14 मुले 17 मुले/मुली गटात नूतन विद्यालय सेलू, (परभणी ग्रामीण)तर 14 मुली गटात जि.प.मा.शा. माजलगाव (बीड) तर 19 मुलात महात्मा फुले मा.वि. माजलगाव (बीड) तर 19 मुलीत गटात नूतन महाविद्यालय सेलू( परभणी ग्रामीण) विजयी ठरले.
विभागीय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धेत 17 /19 मुले गटात नूतन विद्यालय सेलू, (परभणी ग्रामीण)तर 17 /19 मुली गटात राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी स्कुल छञपती संभाजीनगर विजयी होऊन राज्य शालेय फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा साठी पाञ ठरले.
विभागीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत 14 /17 मुले गटात नूतन विद्यालय सेलू, (परभणी ग्रामीण)तर 14/17 मुली गटात जिल्हा परिषद मुलींची शाळा जालना तर
19 मुले गटात पार्थ सैनिकी स्कूल जालना तर 19 मुली गटात ज्ञानसागर विद्यालय सिपोरा जालना विजयी होऊन राज्य शालेय रस्सीखेच क्रीडा स्पर्धा साठी पाञ ठरले.
पंच म्हणून प्रा.नागेश कान्हेकर, किशोर ढोके, राजेश राठोड, किरण घोलप, संतोष शिंदे, स्वप्निल चव्हाण, सुरज शिंदे,गोपाळ आमले ,मुकूंद डमरे, संजय भुमकर,मनोज वाघमारे , बाबासाहेब गोरे, प्रभु भुसारे, बाळू बुधवंत , अनुराग आंमटी, कुणाला चव्हाण, सत्यम बरकुले , आदी काम पाहिले.